मुलीच्या निकामी झालेल्या यकृतावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिले ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी

First Auxiliary Liver Transplant

11 वर्षांच्या मुलीला गेल्या दोन दिवसांसासून शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये योग्य काळजी व इतर उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या चाचणीनंतर तिचे यकृत निकामी झाल्याचे निदान झाले आणि तिला पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

पुढील 24 तासात तिची प्रकृती झपाट्याने खराब झाली. तिच्या यकृत क्रियांच्या चाचण्यांचे निकाल खूप असमान्य होते. यकृत निकामी झाल्याने तिला अॅन्सेफॅलोपॅथी (अल्टर्ड कॉन्शिअसनेस) झाला, अशी माहिती ज्युपिटर रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. विष्णू बिरादार म्हणाले. अशा स्थितीत यकृताचे कार्य पुन्हा सुरु होण्यासाठी रुग्णाला त्वरीत यकृत प्रत्यारोपणाची गरज असते, असे ते म्हणाले.

अॅक्यूट लिव्हर फेल्युअर ही असामान्य स्थिती असून यात मृत्यूची शक्यता जास्त असते. यकृत प्रत्यारोपणाशिवाय बहुतांश रुग्ण जगू शकत नाहीत.

रुग्णाच्या कुटुंबियांच्या तिच्या प्रकृतीविषयीचे समुपदेशन करण्यात आले आणि वडिलांनी आजारी मुलीसाठी यकृत दाता होण्याची इच्छा व्यक्त केली. मुलीची प्रकृती खूपच बिघडल्याने ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांटची योजना आखली गेली. मागील काही दशकांपासून ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांटेशन हा एक उपचाराचा पर्याय म्हणून उदयास आला आहे.

या प्रक्रियेवर प्रकाश टाकत मुख्य ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. गौरल चौबल म्हणाले, ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांट टेकनीकमध्ये,तिच्या मूळ यकृताचा एक भाग- उजवा भाग कायम ठेवला व डाव्या बाजूचा भाग दात्याच्या डाव्या भागाद्वारे बदलला गेला. या विशिष्ट प्रत्यारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे, एकदा तिचे मूळ यकृत बरे झाले की, प्रत्यारोपित यकृताचे काम थांबवण्यासाठी आपण आवश्यक औषधे थांबवू शकतो, असे डॉ. चौबल म्हणाले.

अशा जटील शस्त्रक्रियेला वैद्यकीयदृष्ट्या खूप मागणी होती आणि अनेक गोष्टींमध्ये अतिरिक्त समन्वय लागू शकते. शस्त्रक्रियेनंतर मुलीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मात्र टीमने त्यावर यशस्वी मार्ग काढला, असे पेडिअॅट्रिक इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीनिवास तांबे म्हणाले. दोघेही नियमित फॉलो-अप घेण्यासाठी रुग्णालयात जातात व दोघेही निरोगी व आनंदी आहेत.

रुग्णाचे गंभीर यकृत निकामी (ALF)  होण्याच्या उपचारात यकृत प्रत्यारोपण हे फक्त उपचारात्मक असते. तरीही हे केवळ 18%[1]  केसेसमध्ये केले जाते. एएलएफ सेटिंगमध्ये ऑर्थोटोपिक यकृत प्रत्यारोपणाला एक मौल्यवान पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांटेशन (ALT) मुळे पूर्वीचा अवयव निष्क्रिय झाला असता, यकृताच्या कामांना आधार दिला जातो. जेणेकरून जखमी यकृताचे काम पुन्हा सुरळीत होईपर्यंत आवश्यक वेळ मिळतो.

मुलांमधील अॅक्यूट लिव्हर फेल्युअर किंवा मेटॅबोलिक लिव्हर डिसीजमध्ये फार कमी वेळा झालेली ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया खरी आशा ठरू शकते, असे डॉ. विष्णू बिरादार म्हणाले. महाराष्ट्रात यकृत गंभीररित्या निकामी झालेल्या अवस्थेतील लहान मुलावर प्रथमच ऑक्झिलरी लिव्हर ट्रान्सप्लांट झाले आहे.

रुग्णाची स्थिती व आजाराचे स्वरुप पाहता, शस्त्रक्रिया करणे अत्यंत आव्हानात्मक होते. डॉ. गौरव चौबल शेवटी म्हणाले की, ‘ मुलीची प्रकृती आता खूप चांगली असून ती सुधारणेच्या वाटेवर आहे, याचा आम्हाला खरोखर खूप आनंद होत आहे.”

Courtesy: The Newz Biz